चार मित्र दारू पीत बसलेले असतात..... एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो.... पिंटू - हेलो. पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे. पिंटू - मग? ... ... ... ... ......मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का? पिंटू - ठीक आहे घे.... .....आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे.... पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की. .....जानु, तुम्ही किती चांगले आहात? मी तुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे.... पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल तेघे डार्लिंग.. .. .....जानु आय लव यू... पिंटू - सेम टू यू डार्लिंग.. ...... मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुला काय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस? पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे?????
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा