गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

एक अडाणी माणूस पेन्सिलिनं कागदावर नुसत्याच रेघोट्या ओढत असल्याचे पाहून एका गृहस्थानं त्याला विचारलं, "काय रे! हे काय करतोस?" अडाणी मनुष्य - गावी राहणाऱ्या मोठ्या भावाला मी पत्र लिहितोय. दुसरा गृहस्थ - पण तू तर कागदावर नुसत्या रेघोट्या ओढतो आहेस. त्या तुझ्या भावाला कशा वाचता येणार? तुला लिहिता येत नाही का? अडाणी मनुष्य - मला तर लिहिता वाचता येत नाहीच, पण माझ्या भावाला तरी कुठं लिहिता वाचता येतंय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा