मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

बॅंक ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती इमारतीजवळ एक पानाचे छोटे दुकान होते.
एक दिवस पानवाल्याचा एक मित्र आला 
आणि त्याला म्हणाला, मित्रा, मला दहा रूपये उसने    देतोस?

दिले असते रे!... पण या बॅंक ऑफ इंडियाशी केलेला करार आडवा येतो!...
कसला करार केला आहेस बाबा?

पानवाला म्हणाला, ‘बॅंक ऑफ इंडियाचा आणि माझा करारच झाला आहे. बॅंकेने माझ्याशी स्पर्धा करायची नाही आणि मी बॅंकेशी स्पर्धा 
करायची नाही.
 त्यामुळे बॅंक ऑफ इंडिया पान, सिगारेट, विडी विकत नाही आणि 
मी कुणाला कर्ज देत नाही. आम्ही आमची क्षेत्रे वाटून घेतली आहेत!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा