शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

तो- काय खाऊ या? ती- काहीही चालेल. तो- पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या? ती- शी केव्हढी ऑईली असते. मला पिंपल्स येतात. तो- मग काहीतरी नॉन्-व्हेज? ती- कालच खाल्लंय ना? तो- मग नुस्तंच चहा-ब्रेड सँडविच? ती- मला इथं मरणाची भूक लागलीये, अन तू मला चहा-ब्रेड देणार? तो- मग तूच सांग काय खायचं? ती- काहीही चालेल..!! तो- मग आता आपण काय करू या? ती- काहीही. तुच ठरव. तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झलेत? ती- नको. वेस्ट ऑफ टाईम! तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या. ती- डोकं फिरलंय का? बाहेर ऊन बघ किती ते.. तो- मग कॉफीशॉपमध्ये तरी जाऊ या. ती- नको. पुर्ण दिवस झोप येत नाही कॉफी प्याल्यावर. तो- मग तुच सांग, काय करू या? ती- काहीही. तुच ठरव..!! .. तो- जाऊ दे. सरळ घरीच जाऊ या झालं. ती- काहीही. तुच ठरव. तो- बसनं जाऊ या? ती- शी केवढी गर्दी. अन कसकसले वास येतात त्या बसमध्ये. तो- ठीके. टॅक्सीने जाऊ या मग. ती- पैसे जास्त झालेत का? एवढ्याशा अंतरासाठी टॅक्सी? तो- ठीक. चल मग, चालतच जाऊ. ती- किती दुष्ट तु? रिकाम्या पोटी मला चालायला लावतोस? तो- ठीक. मग आधी जेवू या? ती- व्हाटेव्हर! तो- काय खाऊ या? ती- तुच ठरव..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा