बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३

[टीप:- हा जोक वाचल्यानंतर तुमची प्रतीक्रिया नक्की कळवा,कदाचित दुसर्यावर जोक करताना नक्की विचार कराल]

सरदारी विनोद

काही तरूण मित्रमंडळी दिल्ली पाहण्यासाठी जातात. स्टेशनवरून ते एक रिक्षा करतात. त्या रिक्षाचा ड्रायव्हर एक वयोवृद्ध सरदार होता. रिक्षातून जात असता त्या सरदारला चिडविण्यसाठी, त्रास देण्यासाठी व फिरकी घेण्यासाठी ती तरूण मित्रमंडळी ‘सरदारवर लोकांच्या बुद्धूपणावर असलेले’ विनोद सांगू लागतात. पण तो सरदार न चिडता हसून त्यांचे जोक्स ऐकत राहतो. दिल्ली फिरून झाल्यावर स्टेशनवर आल्यावर ते सरदाराला रिक्षाचं भाडं देतात. तो ते घेतो मात्र त्या पैशातून तो त्या मित्रांना प्रत्येकी एकएक रुपया देतो. एक मुलगा विचारतो, “पापाजी, आम्ही सकाळपासूनसरदारांवर जोक्स मारत होतो व हसत होतो. तरीही आपण आम्हाला एकएक रुपया बक्षिस देता आहात ते का?”

सरदार म्हणतो, “मुलांनो तुम्ही तरुण आहात. तुम्ही मस्ती नाही करायची तर कोणी करायची? पण मी तुम्हाला हा एक रुपया अशासाठी देत आहे की तुम्ही जेव्हा आपल्या गावी जाल तेव्हा तुम्हाला जो सरदार रस्त्यामध्ये भीक मागताना दिसेल त्याला हा रुपया द्या.”

तरूण आपल्या गावी येऊन आता दोनपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत, पण त्या मुलांच्या खिशात अजूनही रुपायाचं ते नाणं पडून आहे कारण भीक मागणारा सरदार त्यांना अजूनही दिसलेला नाही.

तर आपणही सरदारावर जोक्स मारण्याअगोदर हा विचार करा की सरदार काहीही काम करेल. गॅरेज खोलेल, ट्रक चालवेल, ढाबा चालवेल पण भीक कधीच मांगणार नाही.

देशाच्या लोकसंखेच्या १.४% लोकसंख्या असूनही देशाला मिळणा-या टॅक्सच्या ३५% टॅक्स सरदारांकडून येतो. देशाच्या सैनिकांमधील त्यांची संख्या ५००००पेक्षा जास्त आहे. त्यांच्या लंगरमध्ये खाना खाण्यासाठी येणा-यांची जात व धर्म विचारला जात नाही. अल्पसंख्यांक असूनही सरदार आरक्षण मागत नाहीत. देश स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी आपली जास्तीतजास्त मुलं कुर्बान केली आहेत आणि त्याबदल्यात काहीच मागितलं नाही.

निदान सरदारांवर जोक्स करण्याअगोदर हा विचार मनात येऊ द्या की देश स्वातंत्र्यासाठी फाशीवर जाणारा शहीद भगतसिंग सरदारच होता.

1 टिप्पणी: