मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

मित्रांनो १ मिनीट वेळ काढून हे नक्की वाचा..
विजय सुतार राहणार टेंबलाईवाडी कोल्हापूर.
व्यवसाय-रिक्षा.
आपण स्वातंत्र्य दिनादीवशी प्लँस्टिकचे झेंडे,कागदी झेंडे वापरतो व नंतर टाकुन देतो पण हि व्यक्ति सलग ५ वर्षे आपला व्यवसाय सांभाळत रस्त्यांवर पडलेले झेंडे गोळा करत होती,मी स्वतः त्यांच्या रिक्षात होतो मला आठवतय ते आम्हाला शाळेत सोडायला जाताना एखादा झेंडा पडलेला दिसला कि रिक्षा थांबवुन झेंडा उचलायचे. व असे रस्त्यांवरील ५ वर्षात त्यांनी तब्बल ९००० झेंडे केले. त्यावेळी त्यांच्या या कार्याची दखल विवीध संघटनांनी घेतली विवीध ठिकाणी महाराष्ट्रभर त्यांचा सत्कार झाला, मुलाखती झाल्या पण त्यांचा यामागचा हेतू आपण लक्षात घेतला पाहीजे. तेव्हा प्लिज मित्रांनो प्लँस्टीकचे झेंडे वैगेरे वापरणे टाळा आणि तिरंग्याचा मान राखा..
या माणसासाठी अंगठा वर झाला पाहीजे. आणि पटले तर नक्किच शेअर करा. त्याचबरोबर सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा. चिरायु होवो,,,,,,,,,,,,,,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा