बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

एखाद्या घनदाट अरण्यात वाट चुकावी. आणि...
विश्रांतीसाठी म्हणून एखाद्या झाडाखाली बसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच ' वैवाहिक जीवन' म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा