मंगळवार, २१ मे, २०१३

*परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला*

*"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला*

*"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"*

*मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"*

*"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?*

*मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"*

*"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक*

*तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"*

*"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो*

*भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"*

*"काय करू आता माझ्याने manage होत नाही*

*पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत"*

*"immigration च्या requests ने system झालीये hang*

*तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग"*

*"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात*

*माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात"*

*"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation*

*management च्या theory मध्ये मिळेल तुला solution"*

*"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?*

*Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"*

*"असं कर बाप्पा एक Call Center टाक*

*तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक"*

*"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको*

*परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको"*

*माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला*

*"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला"*

*"CEO ची position, Townhouse ची ownership*

*immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"*

*मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"*

*अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?*

*"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं*

*सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"*

*"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव*

*प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"*

*"देशील आणून मला माझी हरवलेली नाती?*

*नेशील मला परत जिथे आहे माझी माती?"*

*"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं*

*आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?"*

*"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार*

*भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार"*

*"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान*

*देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"*

*"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय
पोरा, "सुखी रहा" म्हणाला......*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा