सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
बंड्या : बायकोने भाकरी खूप कडक
बनवली होती.
डॉक्टर : मग खाण्यास नकार द्यायचा ना?
बंड्या : तेच तर केले साहेब!

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३

हे साले मित्र सगळे असेच असतात, चिडवून सतावून जीव नकोसा करतात, तरीही नेहमी हवेसेच वाटतात.
लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून ' आयटम सही है' म्हणून चिडवतात , लग्ना नंतर तीलाच आदराने वहिनी अशी हाक मारतात .े
हे साले मित्र सगळे असेच असतात....
जेवताना एकमेकांच्या डब्यावर सगळ्यांचीच नजर असते, खास पदार्थ सर्वाना पुरेल ,याची मात्र खात्री नसते.
पण... एखाद्या दिवशी डबा नाही आणला, तरी आपलेच ताट इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...
नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच - बिस्किट के ल चहाची अशी ओर्डर सुटते, बिल भरण्याची वेळ आली कि सर्वांचीच पांगा पांग होते ,
मात्र अचानक कधी बाबाना admit करावे लागते, आहोत आम्ही पाठीशी म्हणत advance नकळत भरले जाते.
हे साले मित्र सगळे असेच असतात ...अवचित एखादा प्रसंग ओढावला तर सख्खे नातेवाईक ही पाठ फिरवतात, अशावेळी छळनारे हेच मित्र पाठीशी भक्कमपणे उभे राहतात, रक्ताच्या नात्या पेक्षा ही मैत्रीचे नाते श्रेष्ठ ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात, चिडवून सतावून जीव नकोसा करतात, तरीही नेहमी हवेसेच वाटतात.

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

एखाद्या घनदाट अरण्यात वाट चुकावी. आणि...
विश्रांतीसाठी म्हणून एखाद्या झाडाखाली बसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच ' वैवाहिक जीवन' म्हणतात.

बुधवार, ३१ जुलै, २०१३

प्रत्येक दारु पिणा-याने नक्की वाचा
एक महिला डॉक्टर कडे
गेली त्या महिलेला नवऱ्याने मारले होते त्यामुळे
तीचा डोळा काळा निळा पडला होता.
डॉक्टर ने विचारले काय झाले?
महिला म्हणाली डॉक्टर साहेब मला समजत
नाही की मी काय करू? माझा नवरा रोज दारू
पिऊन येतो आणि मला मारतो.
डॉक्टर म्हणाले यावर माझ्याकडे फारच
चांगला उपाय आहे. जेव्हा तुझा नवरा दारू पिऊन
येईल तेव्हा तू दात घासायला सुरुवात करत
जा आणि दातच घासत जा.
तीन आठवड्या नंतर महिला परत आली.
ती आता व्यवस्थित दिसत
होती आणि आनंदी वाटत होती.
महिलेने डॉक्टरांना सांगितले
तुम्ही सांगितलेला उपाय मी केला.
त्याचा फारच चांगला परिणाम दिसूनआला.
आता माझा नवरा मला मारत नाही आणि भांडण
सुध्दा करत नाही.
डॉक्टर म्हणाले पाहिलेस जर तोंड
बंद ठेवलेस
तर किती फरक पडतो.

मंगळवार, २१ मे, २०१३

एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो,
पोरगी म्हणते...नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार
आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या ...:)

*परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला*

*"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला*

*"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"*

*मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"*

*"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?*

*मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"*

*"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक*

*तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"*

*"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो*

*भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"*

*"काय करू आता माझ्याने manage होत नाही*

*पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत"*

*"immigration च्या requests ने system झालीये hang*

*तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग"*

*"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात*

*माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात"*

*"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation*

*management च्या theory मध्ये मिळेल तुला solution"*

*"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?*

*Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"*

*"असं कर बाप्पा एक Call Center टाक*

*तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक"*

*"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको*

*परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको"*

*माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला*

*"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला"*

*"CEO ची position, Townhouse ची ownership*

*immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"*

*मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"*

*अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?*

*"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं*

*सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"*

*"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव*

*प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"*

*"देशील आणून मला माझी हरवलेली नाती?*

*नेशील मला परत जिथे आहे माझी माती?"*

*"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं*

*आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?"*

*"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार*

*भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार"*

*"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान*

*देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"*

*"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय
पोरा, "सुखी रहा" म्हणाला......*
इंसान की फितरत भी बड़ी अजीब है ...

जब वह डूबता है तब पानी को दोष देता है,

जब वह ठोकर खाकर गिरता है तब पत्थर
को दोष देता है,
.
.
.
.
.
और जब वह कुछ कर नहीं पाता तब किस्मत
को दोष देता है।